पोर्श कार अपघात प्रकरण! बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना जामीन मंजूर

0

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात, बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चालक गंगाधर शिवराज हेरीकुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याचा मोबाईल फोन काढून धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला होता.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

तक्रारदार चालक हा पोर्श कार अपघात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. आरोपी बापलेकांनी चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवत अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. तक्रारदाराचे कपडे आरोपींच्या बंगल्याच्या खोलीतून जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपींनी छेडछाड केली असून, आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा पुराव्यात छेडछाड करू शकतात. अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी आरोपींनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा तपासात अडथळे आणू शकतात, असा युक्तिवाद करत सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला होता.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन