विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत मोठा डाव खेळला. त्यामुळे शिंदे गट देखील ‘अक्टिव्ह मोड’वर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. 2) रात्री सह्याद्री अतिथी गृहावर आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत महायुतीचे सर्व 9 जागा निवडून आणायच्या आहेत, असे सांगत आगामी विधानसभेच्या तयारीलाही लागण्याच्या सूचना केल्या आहेत.






आत्तापासूनच विधानसभेच्या तयारीला लागा. आपआपल्या मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहा, ‘लाडकी बहिण’ सारख्या शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आमदारांना केल्या आहेत. महाविकास आघाडीला MVA लोकसभेत मिळालेल्या यशामुळे महायुतीमध्ये चिंता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाचे आमदार फुटणार याची चिंता देखील महायुतीमधील पक्षांना आहे. नार्वेकर यांचे सर्वपक्षीयांचे असलेले संबंध पाहता त्यांना भाजप, शिंदे गटातून मदत होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदें यांनी बैठक घेत महायुतीच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत, असे सांगत आपल्या आमदारांना इशाराच दिला आहे.
महायुतीचे आमदार फुटणार?
ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. महाविकास आघाडीकडे दोनच उमेदवार विजयी होतील येवढेच संख्याबळ आहे. तिसरा उमेदवार विजयी होण्यासाठी महाविकास आघाडीला पाच ते सहा आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे महायुतीचे पाच ते सहा आमदार फुटणार का?











