भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडांच्या रोपाचे वाटप; नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

0

कोथरुड भारतीय जनता युवा मोर्चा तर्फ़े वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या रोपांचा वाटप कार्यक्रम कोथरूड मध्ये आयोजित केला होता. यावेळी कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला,दीपक पवार सायन देहाडराय, हर्षवर्धन खिलारे, साई थोरवे, सिद्धेश टेमकर, मंदार राजवाडे, पंकज गीते, आशिष सांगळे शुभम कनिच्छे उपस्थित होते.

ह्या उपक्रमाला माहिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि झाडांची मागणी पाहून आम्ही सर्व जण चकित झालो. झाडांचे आणि वृक्षांचे महत्व आपल्या सर्वांना माहीत आहेच आणि वडाच्या रोपांचे वाटप हे तर पुण्याचेच काम यानिमित्ताने वृक्षाची जोपासना करण्याची भावना नागरिकांमध्ये जोपासली जाते ही मोठी गोष्ट असल्याचे आयोजक अमित तोरडमल यांनी सांगितले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार