मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने सालाबादप्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे खारवडे गावाचे सरपंच लक्ष्मण मारणे यांच्या हस्ते पुजन करुन भारतीय इतिहास संशोधन मंडळ सदस्य मंगेश नवघणे, आणि राकेश पिंजण सरकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शिवशंभू व्याख्याते राकेश पिंजण सरकार यांचे संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान करण्यात आले.
मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने दरवर्षी संभाजी महाराज जयंती निमित्त पुरस्कार वितरण करण्यात येते यावर्षी *मोरया जीवन गौरव पुरस्कार कर्तव्यदक्ष अधिकारी सुहास नारायण पांढरे वयाच्या ७६ वर्षी सायकलिंग करुन लाखो पेक्षा जास्त किलोमीटर सायकलिंग करुन पर्यावरण वाचवा हा संदेश देणाऱ्या निरुपमाजी भावे यांना मोरया भूषण पुरस्कार, गेली सात वर्षे मृतदेहांचे शवविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टम चे काम ससुन येथे करत. (पोस्टमॉर्टम) करणे हे इतरांपेक्षा खूप वेगळे आणि कौशल्यपूर्ण काम आहे. जिल्हा रुग्णालय ससून रुग्णालयातील डेडहाऊस येथे हे काम धाडसाचे आणि आव्हानात्मक असते.
गेल्या सात वर्षात आतापर्यंत १० हजारांहून अधिक पोस्टमार्टम करणे हि गौरवास्पद आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात माणूस माणसाजवळ येण्यास घाबरत होता सामाजिक अंतर ठेवत होता त्या काळात कोरोणा ने मृत झालेल्या मृतदेहाचे दारु न पिता शवविच्छेदन केले म्हणून आपण पुण्याचे रत्न आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विक्रांत विकास वशिष्ठ यांना मोरया रत्न पुरस्कार माजी महापौर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत दादा जगताप आणि खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुराताई भेलके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चित्र रंगवणे स्पर्धा, ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या ह्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ माजी नगरसेविका सौ जयश्रीताई गजानन मारणे, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, कोथरूड कॉग्रेस अध्यक्ष विजय खळदकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धा १४ वर्षांखालील, नगर जिल्ह्यातील सोहम अशोक वागस्कर ह्याला प्रथम पुणे येथील आराध्य लांडे द्वितीय क्रमांक इशा नितीन बोराटे हिला तृतीय क्रमांक, खुला गट प्रथम संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड येथील किशोर अशोक मगर द्वितीय योगेन राजेंद्र सावंत (मुंबई), तृतीय वैष्णवी शहाजी पवार (इंदापूर) उत्तेजनार्थ पारितोषिक, प्रणिती पवार,(सांगली) सायली गायकवाड (उत्तर सोलापूर), आर्या गणेश झगडे(गुहागर रत्नागिरी) मल्हार वराळे (पिंपरी)
भव्य चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक
प्रथमेश दिपक जोशी द्वितीय क्रमांक योगेश सतीश वाकडे, तृतीय क्रमांक नेत्रा नवनाथ नायकवडी, चतुर्थ गजानन राक्षे उत्तेजनार्थ शाईस्ता सय्यद, सार्थक गायकवाड, समर्थ माने भव्य चित्र रंगवणे स्पर्धा प्रथम सिया गणेश चव्हाण द्वितीय क्रमांक कार्तिक नितीन पाटील तृतीय क्रमांक अनन्या भाऊसाहेब निर्मळ. उत्तेजनार्थ सुदर्शन रंभू यशराज राऊत. या स्पर्धकांनी पारितोषिके पटकावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते याप्रसंगी बोलताना मारणे म्हनाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडविण्यासाठी आम्ही व्याख्यान, स्पर्धाचे आयोजन करत आहोत छत्रपती चे विचार घराघरापर्यंत पोहचवण्याचे आहे हाच आमचा उद्देश आहे.तसेच शिवरायांसारखी च संभाजी महाराजांची पण जयंती पारंपारिक पद्धतीने जगभर साजरी करा ,मोरया मिञ मंडळाच्या वतीने शिवशंभू भक्तांना आव्हान करण्यात आले.
यावेळी मोरया मित्र मंडळ अध्यक्ष रोहिदास जाधव, उस्तव प्रमुख ऋषिकेश जगताप पुणे शहर राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रोहन पायगुडे, नंदिनी पाणेकर, आनंद तांबे, रेश्मा बराटे, खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संभाजी गावडे,मयुर बनकर,विरेश शितोळे, विष्णूपंत सरगर, गजानन कड, अमृत मारणे, अक्षय केसवड, गणेश गायकवाड, विनायक उभे, स्वाती दारवटकर, पौर्णिमा केसवड, सुरेखा जोशी, रेणुका जावळे, संगिता काळे उपस्थित होते.आभार प्रदर्शन खजिनदार गणेश गायकवाड यांनी केले.