सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0

शिवडी दि. २९ (अधिराज्य) सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ संलग्न महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती जयभीम स्तंभ, शिवडी येथे निखिल संजय भालेराव यांच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर प्रसंगी अत्यंत लाघवी व रसाळ वाणीने योगिता अहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, निखिल भालेराव यांनी धार्मिक विधी संपन्न करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका एफ/ दक्षिण विभागाचे स्वच्छता निरीक्षक सि. बा. जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

संध्याकाळच्या सत्रात भारतीय बौद्ध महासभा व शिवडी बुद्धविहाराचे बौद्धाचार्य सुभाष कटारनवरे यांनी तथागत गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतचा संपूर्ण जीवनपट साध्या, सोप्या व कोणालाही सहज समजेल अश्या पद्धतीने आपल्या प्रवचनात मांडला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणारे सचिव विलास गांगुर्डे, सूनयना कदम, उपाध्यक्ष अश्विनी पगारे, सहखजिनदार संतोष लोखंडे, सविता पगारे, मनीषा कदम, सहउपाध्यक्ष स्वप्नील अहिरे, माजी अध्यक्ष प्रविण तांबे, सहसचिव अमोल सोनवणे, जेष्ठ सल्लागार सुमन खरे, सल्लागार संतोष जाधव, पुष्पा रणखांबे, माजी खजिनदार नलेश गवारे, जनसंपर्क अधिकारी बाळू खैरे, सभासद चंद्रकांत पगारे, आशिष पगारे, अक्षय पवार, राहुल इंगळे, निकेश कदम तसेच देणगीदार, दुकानदार, व्यापारी व शुभचिंतक या सर्वांचे योगिता अहिरे यांनी आभार मानून सरणेतय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती