सौ. कांचन प्रकाश कासे यांचे आकस्मिक निधन

0

परेल दि. ३०: बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २३८ च्या जेष्ठ सदस्या, बोधिसत्व सेवा संघ, माता रमाई महिला मंडळ यांच्या अध्यक्षा तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २३८ चे माजी चिटणीस, मार्गदर्शक, सल्लागार, गट क्र. १३ चे माजी गट प्रतिनिधी, बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय पतपेढीचे चिटणीस आदरणीय प्रकाशजी कासे यांच्या सुविद्य पत्नी व कासे परिवाराच्या कुटुंबवत्सल माता सौ. कांचन प्रकाश कासे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

कालकथित सौ. कांचन कासे ह्या हसतमुख, सर्वसमावेशक, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या, मायाळू माता होत्या, गोडवाणी व लाघवी मधाळ बोलीने जनमानसात त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला होता त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कालकथित सौ. कांचन कासे यांच्या अंत्यदर्शनासाठी गाव व मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कालकथित सौ. कांचन कासे यांचा जलदानविधी व शोकसभेचा कार्यक्रम दि. ०२ जून २०२४ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. २३८ च्या अधिपत्याखाली बौद्धाचार्य मनोहर गोपाळ जाधव यांच्या संचालनाखाली आयोजित करण्यात आली आहे, सदर प्रसंगी आदर्श माता कालकथित कांचन कासे यांना भावश्रध्दांजली अर्पण करण्यास बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कमिटी तसेच सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत तरी कालकथित सौ. कांचन कासे व प्रकाश कासे यांच्या सहवासात असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, स्नेही, आप्तस्वकीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. २३८ च्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती