गुहागर: दि. २ (अधिराज्य) पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कुल पाटपन्हाळे या इंग्रजी माध्यम शाळेने सलग तेराव्या वर्षी ही सन २०२३-२४ दहावीचा निकाल चा १००% देत आपल्या १००% निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे.






यंदा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात न्यू इंग्लिश स्कुल, शृंगाळतळीचे आदर्श कर्मचारी व बौद्धजन सहकारी संघाचे चेअरमन विश्वनाथ बाबू कदम यांच्या सुकन्या कु. स्वराली विश्वनाथ कदम हिने ९१.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर सिया मुनिष जैतपाल ८४.८०% गुण मिळवित द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली तसेच आर्या गणेश मोरे हीने ८२.६०% गुण मिळवित तृतीय क्रमांकावर आपलं नाव कोरले.
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ चा निकाल पाहता गुहागर तालुक्यातील बौद्ध समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनीनी भरघोस टक्केवारी मिळवित मोठे यश संपादन करीत १००% निकाल लावला आहे त्यात कु. स्वराली विश्वनाथ कदम हीने समाजातून तालुका पातळीवर सर्वाधिक टक्केवारी मिळवित यशाचे शिखर पादाक्रांत केले.
सदर सर्वच गुणवंत विध्यार्थ्यांचे समाजातील सर्वच स्तरातून गुणगान होत आहे. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्ष सुचित्राताई वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, खजिनदार सुजाताताई चव्हाण, मुख्याध्यापिका रचना सौंदेकर (पुगांवकर) तसेच संचालक मंडळ, शिक्षिका शिर्के मॅडम, जैतपाल मॅडम, शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांचे बौद्धजन सहकारी संघ गाव व मुंबई शाखेच्या वतीने कौतुक करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या.












