बजेटआधीच ‘अमूल’कडून सर्वसामान्यांना गुड न्यूज; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं दूध!

0

देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने दुधाच्या दरात कपातीची घोषणा केली आहे. यानंतर आता अमूल डेअरीने दुधाच्या दरात प्रती लीटर 1 रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. ही कपात कंपनीच्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी या महत्वाच्या उत्पादनांवर लागू असेल. हे तिन्ही प्रकारचे दूध आता प्रति लीटर 1 रुपयापेक्षा कमी दरात मिळतील. नव्या दरांनंतर अमूल गोल्डचे दर 65 रुपये प्रति लीटर, अमूल टी स्पेशलचे दर 61 रुपये प्रती लीटर आणि अमूल ताजाचे दर 53 रुपये प्रती लीटर असे होणार आहेत.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

एक वर्षांपूर्वीदेखील कंपनीने वाढवले होते दर

दुधाच्या किंमतीत मागच्या एका वर्षापासून सलग वाढ होताना दिसत आहे. अमूल दूधाच्या दरात मागच्या 2 वर्षांमध्ये साधारण 5 रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती. अमूलने फेब्रुवारी 2023 मध्ये दुधाच्या प्रती लिटरमागे 3 रुपये वाढवले होते. मार्च 2024 मध्येदेखील कंपनीने 2 रुपये प्रती लीटर असे दर वाढवले होते.यानंतर इतर दूध उत्पादक कंपन्यांनीदेखील दरात वाढ केली होती. ऑपरेशनल आणि प्रोडक्शन दरात वाढ झाल्याने हे दर वाढवण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. दरम्यान सध्या झालेली कपात कोणत्या कारणामुळे झालीय? हे अमूल दूधची कंपनी गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनने स्पष्ट केले नाही.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

इतर कंपन्याही दरात करणार कपात?

अमूल दूध भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक उत्पादन आणि विक्री केला जाणारा पदार्थ आहे. सर्वसाधारणपणे इतर कंपन्या अमूल दुधाचे दर फॉलो करतात. कारण यामुळे बाजारातील इतर स्पर्धकांवर परिणाम होतो. अमूल दुधाचे दर वाढल्यानंतर इतर कंपन्यादेखील आपल्या दुधाच्या दरात कपात करु शकतात. त्यामुळे बजेटच्या आधीच सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.

शेतकऱ्यांना प्रत्येक लीटरमागे किती रुपये?

अमूल हे दूध उत्पादक करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF)च्या शेतकऱ्यांची संघटना आहे. अमूल दूध कंपनी प्रत्येक लीटरच्या एक रुपयामागे 80 पैसे दूध सप्लाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देते. अमूलने एक रुपया दर कमी करण्याचा अर्थ शेतऱ्यांना मिळणाऱ्या प्रती लीटर फायद्यातील 80 पैसे कमी होऊ शकतात.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?