शूटरचा मोठा खुलासा; ‘बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानलाच मारयचं होतं पण’…

0

अभिनेता सलमान खानच्या जीवाला अजूनही धोका आहे. त्याला आजही तेवढचं संरक्षण आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शूटरने अजून एक मोठा खुलासा केला आहे. ‘बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानला मारायचा प्लॅन होता असा धक्कादायक खुलासा आरोपीनं केला आहे.

बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानलाच मारयचा होता प्लॅन

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला सतत धोका असतो. आता जो खुलासा झाला आहे तो धक्कादायक आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शूटरने सांगितले की, सलमानला मारण्याची योजना होती पण सुरक्षेच्या कारणास्तव तो तिथे पोहोचला नाही.

सलमान खानचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वीच सलमानचा जिवलग मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. आता बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी सलमान खानच्या हत्येचा प्लॅन समोर आला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये सलमान खानचे नाव आहेच

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये सलमान खानचे नाव आहेच तसेच बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानला मारण्याचा प्लॅन होता पण सलमानच्या कडक सुरक्षेमुळे शूटर सलमानपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेत तो सलमानला मारल्याशिवाय बिश्नोई गप्प बसणार नाही” असंही त्या आरोपीने म्हटलं आहे. दरम्यान सलमानला सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याची सुरक्षाही आता वाढवण्यात आली आहे.

एक म्हणजे 4 डिसेंबर रोजी एक अनोळखी व्यक्ती सलमानच्या शूटिंग साईटवर बेकायदेशीरपणे घुसल्याची बातमी आली होती. जेव्हा तो संशयास्पद आढळला तेव्हा त्याची चौकशी केली असता तो माणूस म्हणाला “मी बिष्णोईला सांगू का?” यानंतर त्याला तातडीने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

दादर पश्चिम येथे सलमानचे शूटिंग सुरू होते. उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, सलमानचा एक चाहता होता ज्याला शूटिंग पाहायचे होते, सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवले तेव्हा भांडण झाले आणि त्याने रागाच्या भरात लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतले.

काळवीट मारल्याचा राग अजूनही बिश्नोई समाजात आहे

बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली होती. या प्रकरणात सलमान खानसोबतची मैत्री हे कारण सांगण्यात आले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरामसिंग या दोन नेमबाजांना घटनास्थळावरूनच अटक केली होती. मात्र त्यानंतर मुख्य शूटर शिवकुमार गौतम पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर त्याला बहरीन जिल्ह्यातील नानपारा येथून अटक करण्यात आली. शिवने पोलीस कोठडीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येतायत त्याचं कारण म्हणजे काळवीटाची केलेली शिकार. न्यायालयाने जरी सलमानची निर्दोष मुक्तता केली असली तरी बिश्नोई समाजाकडून त्यांना अद्यापही माफी मिळालेली नाही. तेव्हापासून बिश्नोई समाजाकडून त्याच्याबद्दल द्वेश कायम आहे.

सलमान खानला धमकी देणारा आणि स्वत:ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. “सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि 5 कोटी रुपये द्यावेत. त्यांनी तसे केले नाही तर आम्ही त्यांना ठार मारू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे” अशी धमकी दिली होती. . मात्र या व्यक्तीला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.