उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी, असा ठराव शिवसेनेच्या आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्याचं निश्चित करण्यात आलं. शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेली बघायला मिळत आहे.
Home ताज्या बातम्या उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?