सिनेस्टार जेवढे प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात, तेवढेच त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. अनेकदा हेच सिनेस्टार्स आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून व्हेकेशन प्लान करतात आणि मस्त एन्जॉय करतात. पण, असाच वेळ काढून प्लान केलेलं व्हेकेशन अभिनेत्रिच्या जीवावर बेतलं आहे. थायलंडला सुट्टीसाठी गेलेल्या अभिनेत्रीवर काळानं घाला घातला असून तिचा अपघाती मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री समुद्रकिनारी खडकावर योगा मॅट घालून शांतपणे बसलेली असताना अचानक एक मोठ्ठी लाट आली आणि तिला ओढून घेऊन गेली.
अभिनेत्रीचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ खरंच अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीचा आहे की, नाही? याबाबत कोणताही दावा नाही. पण, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रसिद्ध रशियन अभिनेत्री कामिला तिचा योगा मॅट घेऊन समुद्र किनाऱ्यावर एका खडकावर बसली होती. व्हिडीओमध्ये ती तिचं स्किनकेअर रुटीन फॉलो करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ती तिच्या कामात व्यग्र दिसते, ज्यामुळे तिला समुद्राच्या तीव्र लाटांचा अंदाज येत नाही.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक खंच आणि फेसाळणाऱ्या लाटा एका पाठोपाठ एक येऊन किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यापैकी एक लाट जोरात येते आणि कामिलाला आपल्यासोबत घेऊन जाते. कुणाला काही कळण्याच्या आतच कमिला पाण्यात बुडते. अनेकजण कमिलाला वाचवण्यासाठी धावतात, पण कोणीच कामिलापर्यंत पोहोचू शकत नाही आणि ती खोल समुद्रात बुडूते.