अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधीवर शिक्कामोर्तब

0

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे. उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याला दुजोरा दिला आहे. आपणही पत्र घेऊन राजभवनावर जात असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये स्थापन होत असून या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीसांबरोबरच राष्ट्रवादीचे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट आहे. आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

याआधी उदय सामंत यांनी जर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारलं तर आमच्यापैकी कोणताही नेतादेखील स्विकारणार नाही असं सांगितलं आहे. “एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही आणि आमच्यापैकी कोणावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हीदेखील ते स्विकारणार नाही अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही आमच्या भावना सांगितल्या आहेत. सगळ्यांचं राजकीय करिअर त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून काही केलं जात असेल तर शांत बसणार नाही,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. आमचं करिअर त्यांच्या हातात आहे. त्यांना डावलून कोण काही करत असेल तर ते अयोग्य आहे असंही ते म्हणाले आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असतानाच आता या शपथविधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही दिसू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे या सर्व नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.