भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

0

वैचारिकदृष्ट्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी इतका लवचीक पक्ष कोणताही नाही. ते फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन हिंदु्त्ववादी भाजपसोबत संसार करू शकतात. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) बरोबर आघाडी करून बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे. भाजपसोबत लढण्यासाठी पुन्हा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जावू शकतात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आस्मान दाखवण्याच्या बेतात असलेल्या अजित पवारांनी तिरकी चाल खेळण्याचा विचार केलाय का हा प्रश्न पडतोय त्याचं कारण पडद्यामागे घडणाऱ्या या गोष्टी आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या नाराजीला किनार आहे ती काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं राबवलेल्या ऑपरेशन कमळची होती. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या पक्षाचे डझनभर नगरसेवक भाजपनं काही दिवसांपूर्वी आपल्या गळाला लावले. महायुतीची ही फोडाफोडी अजितदादांच्या जिव्हारी लागली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेली राष्ट्रवादी पुणे महापालिका निवडणुकीत एकटी पडली आहे. राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक असताना ३९ नगरसेवक विजयी झाले होते. त्यात 2 अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी (अजित पवार)कडे ३१, तर राष्ट्रवादी (शरद पवार)कडे १० माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यास भाजपलाच फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते भाजपला काही प्रमाणात का होईना रोखणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी (अजित पवार)ने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

भाजपनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं

पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं आहे. अजित पवारांच्या शिलेदारांनाचं भाजपनं पक्षात घेत राष्ट्रवादीची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेचं अजित पवारांनी भाजपला गर्भित इशारा दिलाय. तर भाजपनंही अजित पवारांना उत्तर दिलंय..

भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोट बांधण्याचा प्रयत्न

एकीकडे भाजपला थेट भिडण्याची तयारी करत असताना अजित पवार पुण्यात तिरकी चाल खेळण्याच्या तयारीत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत मागच्या दाराने दादांनी चर्चा सुरु केल्याचं बोललं जातंय. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

अजित पवारांच्या पुण्याची निवडणूक अस्तित्वाची लढाई

पुणे जिल्हा आणि पवार कुटुंब हे अनेक वर्षांचं समीकरण आहे पवारांच्या या बालेकिल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं अनेकांना पक्षात घेत ताकद दिली आहे. यामुळं पुणे जिल्ह्यातील महापालिकेची निवडणूक ही अजित पवारांसाठी एकप्रकारे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे.यामुळं भाजपविरोधातील या लढाईत सर्व त्या पर्यायाची मदत घेण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात असल्याची चर्चा आहे.