निवडणुक आयोगाची पहिल्यांदाच मोठी कामगिरी! पैशांचा धूर तब्बल 4 हजार 650; दररोज 100कोटीचा माल जप्त

0
1

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून पैशांचा अमाप वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील 75 वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पैसे, मद्य, अंमली पदार्थ, वस्तू जप्त केल्या आहेत. त्याचे मुल्य तब्बल 4 हजार 650 रुपये एवढे आहे. मागील निवडणुकीत आयोगाला संपूर्ण निवडणुकीदरम्यान एवढा पैसा जप्त करता आला नव्हता.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीमध्ये अवैध प्रत्येक पैशांचा वापर रोखण्यासाठी स्थानिक पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत वाहनांची तपासणी तसेच इतर उपाययोजना राबवल्या जातात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून एक मार्चपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

आयोगाकडून दररोज सरासरी शंभर कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापुर्वीच आयोगाच्या टीमने विविध राज्यांमध्ये रोख रकमेसह सुमारे 4 हजार 650 कोटी रुपये मुल्याचे साहित्य जप्त केले रक्कम जप्त केली आहे. 2019 च्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या एकूण रकमेपेक्षा ही रक्कम अधिक आहे.

यंदा लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांत आहे. त्यामुळे पुढील जवळपास दीड महिन्यांत आयोगाच्या हाती मे घबाड लागण्याची शक्यता आहे. आयोगाकडून मागील दीड महिन्यांत 844 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत हा आकडा केवळ 395.39 कोटी एवढा होता. यावेळी 304 कोटींचे मद्द, 1 हजार 279 कोटींचे अंमली पदार्थ, 987 कोटींचे सोने, चांदी व इतर किंमती धातू आणि 60.15 कोटी रुपयांच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रात 431 कोटी जप्त

देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात एकूण 40 कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 28 कोटींचे मद्य आणि 213 कोटींचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण 431 कोटी रकमेचे साहित्य निवडणूक आयोगाकडून जप्त करण्यात आले आहे.