महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्याजागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. बोरस्ते, गोडसेंनी मुंबई वारी केली आहे. मात्र, नाशिकच्या जागेचा निर्णय अजून झालाच नसल्याचं समोर येत आहे. अजून या जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही.






दुसरीकडे छगन भुजबळ देखील मागील ३ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाशिकच्या जागेचा निर्णय होत नसल्यामुळे महायुतीतील इच्छुकांची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकच्या जागेबाबत धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. अजून पुढील काही दिवस नाशिकच्या जागेचा निर्णय नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराचा धडाका लावलेला आहे, तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. या जागेवर शिंदे गटाचा दावा कायम आहेत, जर आता भाजपही या जागेसाठी जोर लावत असल्याचं दिसत आहे.
महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचंही नाव पुढं येत आहे. तर शिवसेना शिंदे गटात खासदार हेमंत गोडसे यांच्या नावासोबतच अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम असल्याचं चित्र दिसतंय.
नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही जागा कोणाला जाणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे नाशिकमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. १९ एप्रिलपासून निवडणूकांची सुरूवात होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे










