टांझानियाचा किली पॉल सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. आजपर्यंत किलीने विविध मराठमोळ्या गाण्यांवरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त किलीनं एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली ‘कंबर कसून बांधणं असं रमाचं नांदणं’ हे भीम गीत गाताना दिसत आहे. किलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आनंद शिंदेच्या स्वरात किली पॉलने सातासमुद्रापार महामानवाला अभिवादन केलं आहे.






किली पॉलचा व्हिडीओ व्हायरल
किली पॉलने व्हिडीओ शेअर करत ‘जय भीम’ असं कॅप्शन दिलं आहे. आनंद शिंदेंच्या स्वरात किली पॉल म्हणत आहे,
“नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी
नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी
कंबर कसून बांधणं असं रमाचं नांदण
कंबर कसून बांधणं असं रमाचं नांदण”.
किली पॉलचा व्हिडीओ-
https://www.instagram.com/kili_paul/?utm_source=ig_embed&ig_rid=35ad5380-1eb2-4be4-9c9c-0c3121612caa
किलीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जय भीम, आंबेडकरवादी किली पॉल, किली पॉल दररोज भारतीयांचं मन जिंकत आहे, भावाने मन जिंकलं,किली पॉलबद्दलचा आदर आणखी वाढलाय, जय शिवराय, जय भीम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
किली पॉलने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर डान्स केला आहे. किली पॉल सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. किलीला इंस्टाग्रामवर 9.1 मिलियन लोक फॉलो करतात. किली पॉल एक लोकप्रिय युट्यूबर आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असते. किलीची बहीण नीमादेखील सोशल मीडियावर वेगवेगळे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. नीमादेखील सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे 619K फॉलोअर्स आहेत.
किली पॉलचं मराठी प्रेम
किली पॉलचं मराठीवर खूप प्रेम आहे. किलीने काही दिवसांपूर्वी काय सांगू राणी मला गाव सुटना, मावळं आम्ही वादळ आम्ही, नांदण नांदण रमाचं नांदण, बहरला हा मधुमास नवा, एका वाघाची शिकार एका हरणीने केली, अशा अनेक गाण्यांवर व्हिडीओ बनवले आहे. सोशल मीडियावर या सर्व व्हिडीओला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.











