दुर्मिळ घटना, पुण्यात कोर्टच रुग्णालयात आले…कारण काय?

0

पुणे शहरात दुर्मिळ घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केली नाही. त्यानंतर कोर्टच रुग्णालयात पोहचले. रुग्णालयात कोर्ट भरले आणि निर्णय दिला. पिंपरी- चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेच्या आरोपीबाबत ही घटना घडली. या घटनेची चर्चा चांगली रंगली होती. पिंपरी- चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणात रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि वकील सागर सूर्यवंशी आरोपी आहेत. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली होती. परंतु तपास अधिकाऱ्यांनी सागर सूर्यवंशी याला कोर्टात हजर केले नाही. पोलिसांनी न्यायालयास आरोपीला ससून रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीला पाहण्यासाठी एमपीआयडीचे कोर्ट रुग्णालयात पोहचले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

रुग्णालयात भरले कोर्ट

एमपीआयडी कोर्टचे न्यायाधीश के. पी. नांदेडकर आपल्या कर्मचाऱ्यासह ससून रुग्णालयात गेले. यावेळी त्यांच्याबरोबर सरकारी वकील मारुती वाडेकर होते. ससूनमध्ये वॉर्ड नं. 15 मध्ये कोर्ट गेले. त्याठिकाणी कोर्ट भरवण्यात आले. कोर्टाने डॉक्टरांना आरोपीला तपासण्यास सांगितले. त्यांची प्रकृती कशी आहे? असे डॉक्टरांकडे विचारणा केली. डॉक्टरांनी आरोपींची तब्येत चांगली आहे. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास झाला असल्याचे सांगितले.

आरोपींना दिली कोठडी

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनंतर न्यायालयातने आरोपी सूर्यवंशी याला वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कोठडी दिली. तर विनय अर्‍हाना याला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. या घटनेमुळे ससून रुग्णालयाला न्यायालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

सीआयडीने केली होती अटक

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विनय अर्‍हाना आणि सागर सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना सीआयडीने अटक केली होती. २८ मार्च रोजी आरोपींना विशेष न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्यापुढे हजर केले. त्यांनी दोन्ही आरोपींना चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलिसी कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. परंतु सूर्यवंशी रुग्णालयात असल्यामुळे कोर्टात हजर झाला नाही.