भिवंडीत मविआत बंडखोरीचे संकेत? थोरल्या पवारांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसची नाराजी, इच्छुक उमेदवार अपक्ष लढणार

0

राज्यातील इतर जागांसह भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढत असल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार, मैत्रीपूर्ण लढत देणार अथवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भिवंडी लोकसभेसाठी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चोरघे यांनी भिवंडीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

संपूर्ण कोकण प्रांतातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे परंपरागत असलेला कोकण प्रांत आणि भिवंडी लोकसभेतून काँग्रेसची निशाणी मतपेटीतून आणि कोकणातून हद्दपार होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी या बाबीचा विचार करून राज्यात सांगलीच्या जागेबद्दल जशी मैत्रीपूर्ण लढत देण्याचा विचार होत आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून देखील आपली मैत्रीपूर्ण लढत देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले, तर मैत्रीपूर्ण अन्यथा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी लढू, अशी प्रतिक्रिया चोरघे यांनी दिली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

भिवंडीत शरद पवारांचं ट्रम्प कार्ड; बाळ्यामामांना रिंगणात उतरवलं

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपनं विद्यमान खासदार कपिल पाटील केंद्रीय मंत्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. परंतु, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ज्याप्रमाणे सांगलीत वरिष्ठांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेमध्ये देखील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत लढवायची असेल, तर मी मैत्रीपूर्ण लढत लढायला तयार आहे. तसेच, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये संगनमत झालं तरी मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवण्यास देखील तयार असल्याचं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता