“श्रीपाद श्रीवल्लभ परिवार” तर्फे प्रथमच 3 दिवसीय “श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्र पठण” व “पादुका पूजन-दर्शन”, “अनघालक्ष्मी व्रत” कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट वारजे येथील (वाल्हेकर दत्त मंदिरात) पिठापूर येथील प्रासादिक पादुकांची पूजा, पालखी, अभिषेक, होमहवन , सिद्धयोग साधनेचा पूर्वाभ्यास भाविकांकडून करून घेण्यात आला.






55 भाविकांनी 3 दिवशीय श्रीपाद श्री वल्लभ चरीत्राचे पारायण केले. यावेळी पावश्या गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण दांगट , वारजे सामाजिक कार्यकर्ते केदार बराटे, दयानंद पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ वाल्हेकर यांनी कार्यक्रमाचे केले यावेळी सेवेकरी सौ अश्विनी कश्यप ,मनोज रानडे ,शुभांगी पोळ गौरव गायकवाड ,देसाई काका ,हेमंत भालेराव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.











