पुण्यात नक्की चाललंय तरी काय? भर रस्त्यात भर दिवसा कोयत्याने हाणामारी

0

पुणे शहरात कोयता गँगने दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याच्या घटना सातत्याने पाहायला मिळतात. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील उपाययोजना केल्या जातात. यादरम्यान पुणे शहरातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत चाललेली हाणामारीमुळे एकच खळबळ उडाल्याचे पाहयला मिळाले.

दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात भररस्त्यावर कोयत्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर सर्रासपणे केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साध्या भांडणात देखील कोयता वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यासोबतच भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी देखील कोयत्याने हाणामारी केली जात असल्याने पुणे पोलिसांकडून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रर देखील पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट