चालत्या बसला एक्सप्रेस-वे वर आग, 8 भाविक भक्त जिवंत जळाले; 24 जण गंभीर थरकाप उडवणारा व्हिडिओ

0
1

तावडू उपविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी शनिवारी रात्री भाविकांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. यामध्ये बसमधून प्रवास करणारे आठ जण जिवंत जळाले, तर दोन डझनहून अधिक जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालत्या बसमध्ये आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली, यानंतर अग्रिशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.

अपघातात बळी पडलेले पंजाब आणि चंदीगडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून ते मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन परतत होते. याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

(बातमी अपडेट लवकरच…..)