माहिती अधिकार कार्यकर्त्याला शासकीय इमारतीच्या आवारात मारहाण; मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल

0
31

जिल्हा परिषदेच्या आवारात माहिती अधिकार कार्यकर्त्याला एका मुक्त पत्रकाराने मारहाण केली. या मारहाणीत माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दात पडला असून, याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी राहुल बानगुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बानगुडे मुक्त पत्रकार आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते भैयासाहेब जगन्नाथ शिंदे (वय ५२, रा. वरकुटे बुद्रुक, लोणी देवकर, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. ते जिल्हा परिषद कार्यालयात माहिती अधिकारात माहिती घेण्यासाठी अर्ज घेऊन आले होते.

जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेत राहुल बानगुडे याने त्यांच्याकडे अर्जाची प्रत मागितली. शिंदे यांनी त्याला प्रत देण्यास नकार दिला. या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. बानगुडेने शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. या वेळी झालेल्या झटापटीत बानगुडेने शिंदेच्या तोंडावर बुक्की मारली. या मारहाणीत शिंदे यांचा एक दात पडल्याने ते जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक परमेश्‍वर गर्कळ तपास करत आहेत.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार