वारजे :येथील सामाजीक कार्येकर्ते तसेच मानवता सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक दिपक बलाढे यांची राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी ही निवड केली आहे.
नियुक्तीचे पत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी त्रिंबक मोकाशी, सुरेश गुजर, माजी नगरसेविका सायली वांजळे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सामाजीक उपक्रमांच्या माध्यमातून पक्ष संघटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे बलाढे यांनी सांगितले.