लातूरमध्ये मोठा राजकीय भूकंप; काँग्रेसमधील आणखी एक मोठं कुटुंब भाजपमध्ये

0

ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. तर, निवडणूक काळात भाजप अधिक मजबुतीने उभा राहताना दिसत आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने भाजप लातूरमध्ये बळकट झाली आहे.

भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील आणि उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधील एक मोठं कुटुंब आणि मराठवाड्यातील मोठ्या नेत्याची सून भाजपमध्ये आल्याने मराठवाड्यात भाजप अधिक बळकट होण्यास मजबूत होणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

म्हणून निर्णय घेतला
अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये येण्याबाबतचं कारण जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात अनेक मोठी कामे केली आहेत. विकासाच्या कामाने देशाची प्रगती झाली आहे. मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणलं. त्यामुळे राजकारणात येण्यापासून घाबरणाऱ्या महिलांना आता राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी यांच्या या निर्णयाने प्रभावित होऊनच मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मी सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज सारख्या नेत्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचं काम पाहिलं आहे. त्यांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे, असं सांगतानाच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठी राहू द्या, असं अर्चना पाटील म्हणाल्या.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

शिवराज पाटील यांचं कौतुक
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवराज पाटील चाकूरकर यांची वरेमाप स्तुती केल्याने आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे. शिवराज पाटील यांनी मूल्यावर आधारीत राजकारण केलं आहे. त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. समाजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे, असा गौरव देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांनी थेट शिवराज पाटील चाकूरकर यांची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.