बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने प्रशिक्षित बौद्धाचार्यांच्या परीक्षा परीक्षाकेंद्रात शिस्तबद्ध वातावरणात संपन्नसामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सहकार क्षेत्रात प्रबोधनाच्या माध्यमातून मानवात परिवर्तन घडवून त्याला खऱ्या अर्थाने माणूस घडवणे त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे या उद्देशाने बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मा. सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर, मा. कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, मा. सरचिटणीस राजेश घाडगे यांच्या संकल्पनेतून संस्कार समिती अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार गुरुजी, सरचिटणीस मनोहर बा. मोरे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली बौद्धाचार्यांच प्रशिक्षण शिबीर ११ नोव्हेंबर २०२३ ते ११ मार्च २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.






सदर शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य व बौद्धाचार्यां करिता शनिवार दि. २३ मार्च २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे लेखी परीक्षा, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या, या परीक्षांचे परीक्षक म्हणून आयु. मनोहर तांबे, आयु. बाळकृष्ण मोहिते, आयु. चंद्रशेखर गायकवाड, आयु. मंगेश बा. पवार, आयु. संदिप गमरे ,आयु. संतोष तांबे – सावरकर, आयु. प्रशांत मोहिते, आयु. सुगंध कदम ,आयु. विशाल वळंजू, आयुनि. गौतमी पवार, आयुनि. प्राजक्ता तांबे या सर्व बौध्दाचार्यांनी पारदर्शक पद्धतीने काम पाहिले. परीक्षार्थी बौद्धाचार्य व बौद्धाचार्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अश्या तिन्ही स्वरूपातील परीक्षा विनम्रतापणे दिल्या, बोधिसत्व तथागत गौतम बुद्धांच्या वाणीतून अखिल जगाला सूर्यप्रकाशाप्रमाणे निष्कलंक, निष्कपट व शाश्वत मिळालेला धम्म पुढे नेण्याच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर येणार आहे व आपण ही ती यथायोग्यपणे पेलवू याबाबत वाटत असणारी धन्यता परीक्षार्थींच्या तोंडावरून ओसंडून वाहत होती, सदर परीक्षा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संस्कार समितीचे अध्यक्ष आयु.मंगेश भा.पवार आणि चिटणीस मनोहर बा.मोरे यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.











