माजी मंत्री विजय शिवतारे रुग्णालयात दाखल!; दीपक केसरकर आणि राहुल शेवाळेही तातडीने पोहचले

0

नियमित तपासणीसाठी विजय शिवतारे काल ( दि. 15 मोर्च) रात्री पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवातरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. या दरम्यान शिवसेना नेते दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी शिवतारे यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघात आपण अजित पवार विरोधात लोकसभा निवडणुकीत उभे राहणार आहोत अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली.

शिवतारेंच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये अडचणी निर्माण झाल्याच दिसतं आहे. विजय शिवतारे यांनीं थेट अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार असतील असं बोललं जातंय तर शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली गेली आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन