लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी भाजपा, काँग्रेसससह सर्वच पक्ष तयार आहेत. निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. पीएम मोदी यांनी NDA आघाडीसाठी 400 जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलं आहे. काँग्रेसने विरोधी पक्षांची INDIA आघाडी केलीय. त्यांचा भाजपाला रोखण्याचा प्रयत्न आहे. सत्तेच्या खुर्चीवर कोणाला बसवायच? याचा फैसला जनता करणार आहे. यामुळे जनता इंडिया की, एनडीए कोणावर विश्वास दाखवणार? ते महत्त्वाच आहे.

ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा विजय मिळू शकतो. ओपिनियन पोलनुसार, भाजपा NDA ला प्रदेशातील 80 पैकी 73 जागांवर विजय मिळू शकतो. INDIA आघडीचा जास्त प्रभाव यूपीमध्ये दिसणार नाही. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळू शकतो. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी 6 जागा मिळू शकतात. 73 पैकी 70 जागा एकट्या भाजपाला मिळू शकतात.
बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?
ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये सुद्धा भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला मोठा विजय मिळेल. इथे 40 लोकसभा मतदारसंघात एनडीएला 38 सीट मिळू शकतात. दोन जागांवर काँग्रेस विजयी होऊ शकते. बिहार मध्ये 40 पैकी 17 सीट बीजेपी आणि जनता दल यूनायटेडला 15 सीटवर विजय मिळू शकतो. लोकजनशक्ति पार्टीला 5 सीटे मिळू शकतात. जीतन राम मांझी यांच्या HAM पार्टीला एक जागा मिळू शकते. INDIA आघाडीच्या खात्यात फक्त दोन जागा जाऊ शकतात. लालू प्रसाद यादव यांच्या RJD ला तगडा झटका बसेल.
पंजाबमध्ये केजरीवालच सरस
ओपिनियन पोलमध्ये आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये सगळ्यांनाच धक्का दिलाय. पंजाबमध्ये 13 पैकी आपला 11 जागांवर विजय मिळू शकतो. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला फक्त 2 जागांवर समाधान मानाव लागेल. काँग्रेस पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढतेय. त्यांना एकही जागा मिळणार