पुण्यातील स्वारगेट येथील तरूणीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा तापलेला असतानाच भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडलाय. भरयात्रेत काही टवाळखोरांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढली.सुरक्षारक्षक असूनही टवाळखोरांनी मुलींची छेड काढली.






या प्रकरणी आरोपींविरोधात पोक्सोअंतर्गत गु्न्हा दाखल केला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण त्या दिवशी नेमकं घडलं काय? हे प्रकरण कधी आणि कुठे घडलं?
नेमकं घडलं काय?
जळगावातील मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे. ही यात्रा खूप मोठी असते. या यात्रा महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत गेली होती. रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत आकाशपाळण्यामध्ये गेली. मात्र, अचानक काही टवाळखोर आले. त्यांनी मुलींची छेड काढली.
सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. मुलींना धक्काबुक्की केली. नंतर पसार झाले. सुरक्षारक्षकानं तातडीनं पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. याची माहिती रक्षा खडसे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. काही तासात आरोपींना अटक झालीच पाहिजे, अशा सूचना त्यांना दिल्या.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. खडसे यांनी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जळगावाचं वातावरण तापलंय. मंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.











