प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरांच्या वडिलांचे कारनामे समोर; पुणे कोल्हापूर सातारा मुंबई निलंबन अन् लाखोंची..

0

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता त्यांचे वडील दिलीप खेडकर यांचे कारनामेही समोर आले आहेत. सेवेत असताना दिलीप खेडकर यांना दोन वेळा निलंबित करण्यात आले होते. वेगवेगळ्या लाचखोरीच्या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

दिलीप खेडकरांच्या सेवेची कुंडली

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१), महाराष्ट्र नागरी सेवा १९७९ च्या नियम ४ मधील उपनियम १(अ), महाराष्ट्र जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम १९८३ मधील नियमानुसार तत्कालीन विभागीय अधिकारी दिलीप खेडकर यांना २४ फेब्रुवारी २०२० रोजी चौकशीच्या अधीन राहून निलंबित करण्यात आले होते.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

दिलीप खेडकरांचे लाचेच प्रकरण काय?

जेव्हा दिलीप खेडकर हे मुंबई विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. तेव्हा 300-400 छोट्या उद्योजकांनी तक्रार दिली होती. दिलीप खेडकर मुंबई क्षेत्रातील व्यवसाय मालकांना आणि प्रतिष्ठांना त्रास देत आहेत आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत आहेत, अशी ती तक्रार होती.

६ ऑक्टोबर२०१५ रोजी मुख्यमंत्र्याकडे याबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाने या तक्रारीची दखल घेतली होती. पुण्यातील सुप्रभा पॉलिमर अँड पॅकेजिंगने १३ मार्च २०१९ रोजी तक्रार केली होती की, विभागीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी २० लाख रुपये मागितले आणि १३ देण्याबद्दल तडजोड झाली. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

कोल्हापूरमध्ये खेडकरांनी उद्योजकांकडून वसुली केल्याचे प्रकरण

दिलीप खेडकर हे जेव्हा कोल्हापूरमधील विभागीय कार्यालयात सेवेत होते, तेव्हा प्रदूषण मंडळाकडे कोल्हापूर मिल अँड टिम्बर मर्चेंटने तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षकांमार्फत ही तक्रार मिळाली होती.

१ मार्च २०१८ रोजी मिळालेल्या या तक्रारीत दिलीप खेडकर उद्योजकांकडून पैसे मागत असल्याचे आणि पाणी व वीज पुरवठा करण्यासाठीही पैसे मागत असल्याचे नमूद केलेले होते. नोटीस परत घेण्यासाठी २५ हजार ते ५० रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

साताऱ्यातही दिलीप खेडकरांनी मागितले होते पैसे

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

दिलीप खेडकर यांच्याविरोधात साताऱ्यातील सोना अलॉईज प्रा.लि.ने १५ मार्च २०१९ रोजी तक्रार दिली होती. त्यात म्हटले होते की, ५० हजार रुपये खेडकरांनी मागितले. हे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दिलीप खेडकरांकडून त्रास दिला जात आहे.

विभागीय अधिकारी दिलीप खेडकरांची कोल्हापुरातील मैत्री कक्षातून मुंबईत बदली करण्यात आली होती. पण, त्यानंतर दिलीप खेडकरांनी पदभार स्वीकारला नव्हता. परवानगी न घेता ते ६ ते ७ महिने गैरहजर राहिले होते.