कट रचून जर ‘हा’ प्रयत्न झाल्यास फडणवीस साहेब तुमचा १ही खासदार विजयी होऊ देणार नाही: जरांगेंचा इशारा

0
1

मराठा समाजासाठी आंदोलन करतोय म्हणून मला बदनाम केलं जातंय. माझे बनावट व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. पण मी देवेंद्र फडणवीसांना इतकंच सांगतो. भलेही तुम्ही मला बदनाम करा, पण कट रचून मराठा समाजापासून मला तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा ४८ पैकी एकही खासदार लोकसभेत निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे गुरुवारी (ता. १४) मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. या बैठकीला हजारो मराठा बांधव उपस्थित होते. बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर टीकेचा भडीमार केला.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

“भाजपचे लोक माझ्याविषयी बनावट व्हिडीओ तयार करत असून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मी मराठा समाजापासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी घाबरु नये”.

“मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो, की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते मी करणारच आहे. तुम्ही कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करेन”, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

“आपल्या विरोधात मराठा समाजाचा इमानदार पोरगा लढतोय, याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. तर तुम्हाला खरे राजकारणी म्हटलं गेलं असतं. पण देवेंद्र फडणवीसांची वृत्ती नीच आहे. मी तुम्हाला वडवणीतून आव्हान देतो आहे. तुम्ही मला भलेही बदनाम करा. पण समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही”, असा इशाराच जरांगेंनी फडणवीसांना दिलाय.