फडणविसांची शरद पवारांच्या वयावरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर टीका ८३ वर्षाचा योद्धा! ही फक्तं…

0
1

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दीक युद्ध सुरू आहे. यादरम्यान फडणवीसांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या वयावरून वक्तव्य केलं आहे. ते निलम गोऱ्हे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारल पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाने राज्यातील राजकरण ढवळून निघालं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून अजित पवार आणि शरद पवार हे आमने-सामने उभे ठाकल्याचे पाहायला मिळालं. शरद पवारांनी महाराष्ट्र भरात सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्यापासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

फडणवीस काय म्हणाले…

दरम्यान यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जसे शरद पवारांनी जाहीर केलं तसं अजित पवारांनी देखील जाहीर केलं की तेही सभा घेतील. मुख्यमंत्री आणि मी आम्ही देखील सभा घेत आहोत. लोकशाही आहे कोणाला हवं त्याने सभा घ्यावी.

८३ वर्षाचा योद्धा..

आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांना ( शरद पवार) शंभर वर्ष आयुष्य लाभो. त्यांना हवं तेवढे वर्ष राजकारण करू देत. ८३ वर्ष वयाचा पुन्हा-पुन्हा उल्लेख करून त्यांचे काही कार्यकर्ते सहानूभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, असे फडणीस म्हणाले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

दरम्यान बुधवारी झालेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा दाखला देत तुम्ही थांबणार आहेत की नाही असा प्रश्न विचारला. यावर काल शरद पवारांनी वयावर प्रश्न विचारणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तर देताना, मी अजुनही कार्यक्षम आहे. मग ८२ काय आणि ९२ काय मला फरक पडत नाही,असं उत्तर दिलं आहे. या राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर शरद पवार गटाकडून ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात अशा स्वरूपाच्या जाहिरात देखील केली जात आहे.