बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरला आहे. तीन महिने झाले तरी या प्रकरणत रोज नवे दावे, खुलासे होत आहे. नुकतीच तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये फोटो, व्हिडीओ, आरोपींचे, कुटुंबियांचे, साक्षीदारांचे जबाब आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि लेक वैभवी देशमुखचा यांनी पोलिसांना दिलेला जबाब समोर समोर आला आहे. या जबाबात दोघींनीही संतोष देशमुखांचे पुण्याशी असलेले खास नाते सांगितले आहे.






मस्साजोग गावात असलेल्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी बंद पडू नये गावात रोजगार चालू राहावा, अशी सरपंच संतोष देशमुखांची इच्छा होती. त्यामुळे आरोपी ज्यावेळी खंडणी मागायला आले आणि मस्साजोगच्या वॉचमनला मारहाण केली.मारहाण करणाऱ्यांना मस्साजोग च्या तरुणांनी मारहाण केली आणि व्हिडिओ व्हायरल झाला. मारहाण झालेल्या तरुणांना बदला घ्यायचा म्हणून सरपंच संतोष यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे कायमच गावच्या भल्यासाठी झटत असे. पत्नी आणि लेकीच्या जबाबनुसार संतोष देशमुख हे गावातील दारुचे व्यसन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत होते. गावातील ज्या लोकांना दारुचे व्यसन आहे त्यांना ते पुण्याला घेऊन जात असे.
संतोष देशमुखांच्या गळ्यात कायम पंचरंगी जाड धागा
पत्नी आश्विनी देशमुखने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझे पती गावातील व आजुबाजुच्या गावातील दारुचे व्यसन असलेल्या लोकांना दारु सोडवण्याकरीता पुण्यातील डोणजे येथील निळकंठेश्वर मंदिरात घेऊन जात असे. त्याठिकाणी तेथील पुजारी लोकांच्या गळ्यात पंचरंगी जाड धागा बांधत असतं. माझे पतीनेही त्याठिकाणी असा पंचरंगी जाड धागा गळ्यात घातला होता. ज्यावेळी मी माझ्या पतीचे प्रेत पाहिले त्यावेळी त्यांच्या गळ्यात पंचरंगी धागा नव्हता.p
संतोष देशमुख पत्नीला काय म्हणाले?
संतोष देशमुखांच्या हत्येच्या एक दिवस पत्नीला त्यांनी आपल्याला टेन्शन आल्याचं सांगितलं. “विष्णू चाटेचा फोन होता. वाल्मिक कराडच्या लोकांना मी त्या दिवशी कंपनीत जाताना अडवले म्हणून विष्णु चाटेने आज पुन्हा फोन केला होता. तुला आमच्या आणि कंपनीच्यामध्ये पडायची काय गरज होती. आम्ही, वाल्मिक अण्णा आणि कंपनीवाले आमचं आम्ही बघून घेतलं असतं. तुला आता हे लई जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असे तो म्हणत होता. त्यामुळे मला टेन्शन आलय.” असे माझ्या पतीनी मला सांगितले.











