हिंगणे होम कॉलनी सभागृह कर्वेनगर येथे सर्वोदय ज्येष्ठ नागरिक संघ, संजीवनी जेष्ठ नागरिक संघ व पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन व कायदेविषयक सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ॲड. प्रीती परांजपे, सूर्यदेव वृद्धाश्रमाच्या संस्थापिका सौ छाया भगत, समाज विकास विभागाच्या समन्वयक सौ क्रांती जाधव, स्त्री संसाधन केंद्राच्या समन्वयक सौ सुजाता करवंदे यांनी विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.






त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष व समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद तांबे यांनी जेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य शिबिर वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असावे, जेष्ठ नागरिकांना एसटी व बस् चा पास मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिकांच्या कौटुंबिक समस्या निवारण करण्यासाठी मोफत कायदा विषयक सल्ला केंद्र उभारावे इत्यादी गोष्टी प्राधान्याने करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले, याप्रसंगी कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी, शाहू कॉलनी, वारजे जकात नाका येथील माननीय श्री एकनाथ वरखडे, देविदास तनपुरे, परशुराम शेलार, सुरेश तोंडे, प्रकाश थोपटे, उमाकांत पांडे, शंकरराव कुडले, विष्णुपंत कुडले, चंद्रकांत जाधव, जनार्दन आंब्रे, रावसाहेब उन्हाळे, आर जी पवार, संगीता शिनगारे, प्रमिला वाळंज, संगीता बडदे, लता खडतरे इत्यादी अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे हे होते तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाज विकास विभागाच्या समन्वयक सौ क्रांति जाधव यांनी केले.











