पुणे महापालिकेच्या हद्दीत व्यावसायिकांकडून वारंवार अनधिकृतपणे झाडांची होणारी कत्तल सुरू असतानाच कोथरूड भागांमध्ये ही असाच एक प्रकार निदर्शनास आला आहे; परंतु आजपर्यंत वारंवार तक्रारी करूनही यावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.






कोथरूड सर्वे नंबर १२६, १२७ रामबाग कॉलनी रोड येथील २० वर्षापासून जुने उंबराचे झाड बेकायदेशीर बुंध्यापासून तोडले असून पुणे महापालिकेच्या वतीने मात्र कारवाई करण्यास विलंब होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय व उद्यान विभाग हेतू:हा डोळेझाक करत आहेत असा आरोप तक्रारदार नागरिकांनी केला आहे.
याबाबत पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व उद्यान विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही.












