पुन्हा मोठा राजकीय भुकंप? उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार शपथ घेणार? आमदारांची ही आग्रही भूमिका

0

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार हे विधानभवनावर दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आपली वेगळी भूमिका मांडली होती. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित दादांच्या भूमिकेविषयी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, विरोधी पक्ष नेता म्हणून विधीमंडळाच्या सदस्यांची बैठक बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आजचा विषय काय आहे याची सविस्तर माहिती आलेली नाही. संध्याकाळपर्यंत लोक येत-जात आहेत, यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही असे पवार म्हणाले होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दरम्यान, विरोधीपक्ष पवार यांनी देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्विकारावे अशी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पुण्यात असलेल्या शरद पवारांनी या बैठकीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.