डॅाक्टर डे औचित्य साधुन सालाबादप्रमाणे १ जुलै रोजी माई मंगेशकर हॅास्पिटल , बोरीकर हॅास्पीटल , , चैतन्य हॅास्पीटल , कवडे हॅास्पीटल , साई क्लिनीक , शहा क्लिनीक ,शुभदा क्लिनीक , बर्वे क्लिनीक , शिंदे क्लिनिक यांचे सहित वारजे , कोथरूड आणि पुणे डॅाक्टर असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी असलेले ५० डॅाक्टरांचा एक रोपटे , सन्मानपत्र देऊन सन्मान करुन त्यांच्या सेवेप्रती आदर आणि आभार व्यक्त करण्यात आले.
भारताचे प्रसिध्द चिकित्सक डॅा.विधानचंद्र रॅाय यांना श्रध्दांजली आणि त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन १९९१ सालापासुन १ जुलै हा दिवस भारत देशात डॅाक्टर्स डे साजरा केला जातो. कोवीड या महामारीचे काळात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी डॅाक्टरांनी पणाला लावलेले कौशल्य , त्यांचे ज्ञान, कामाप्रती असलेली निष्ठा आणि अनेकांनी गमावलेले प्राण संपुर्ण जगाने पाहिले आहे. या उपक्रमाचे यंदा ९ वे वर्ष आहे . फक्त निवडणुकीच्या तोंडावर आठवण न काढता दरवर्षी न चुकता सातत्याने सन्मान करीत असल्याने अनेक मान्यवर डॅाक्टरांनी या ऊपक्रमाचे विशेष कौतुक केले .
याप्रसंगी सचिन दशरथ दांगट अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर, भाजपा सहकार आघाडीचे खजिनदार सुभाष आगरवाल, कविवर्य राजेंद्र वाघ, सौ. मनिषा सचिन दांगट, सौ. रेश्मा पाटणकर , सौ. रंजना वाघ, व्यंकटेश दांगट, यांचेसह अनेक मान्यवर डॅाक्टर उपस्थित होते.