इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू, विरगळ ,विहिरी, अतिप्राचीन टाक्या, घाटवाटा यांचे संवर्धन,प्राचीन अवशेष असलेल्या जागा साफ करून इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे.
प्रतिष्ठान मधील युवकांनी पाणी संवर्धनाचा मूलमंत्र घेवून मुळशी तालुक्यातील ताम्हिणी येथील पराते वाडी मागे असणाऱ्या सावळ घाटावर 3 पाण्याचे टाके आहे. त्यातील 2 टाक्या मधील गाळ व गवत वाढल्याने पाणी पिण्या अयोग्य होते, सावळ घाट हा देश व कोकण यांना जोडणारा अति प्राचीन ताम्हिणी ते भिरा मार्ग आहे. ताम्हिणी राज्य मार्ग असल्याने ह्या मार्गाचा क्वचित,दुर्गप्रेमी,भटके मंडळी या वाटेचा उपयोग करतात.पण उन्हाळ्यात काही भटके ट्रेक करतात. त्यांची पाणी प्यायची सोय नसल्याने पाणी वाचून उपासमार होते. ह्यावेळी भीषण पाणीटंचाई असल्याने हीच उपासमार टाळण्यासाठी स्वराज्याचे शिलेदार मार्फत ही मोहीम आयोजित केली होती.
छ्त्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून* ही पाणी संवर्धन मोहीम हाती घेवून सावळ घाटावर शिवप्रतीमा व साहित्याचे पूजन करून गूळ खोबर अन् केळ या संवर्धन प्रसादाचा भोग घेवून श्री गणेशाला वंदन करून पाण्याचा उपसा करून गवत व गाळ काढण्यास सुरुवात केली, ऊन पावसाचा शिडकावा मध्ये पूर्णपणे पहिल्या टाक जे 5 बाय 12 फूट आहे त्यातील 4 फूट गाळ मोकळा करून तो भाग स्वच्छ करण्यात आला.दुसऱ्या टाक्यातील गाळ शिवदुर्ग संस्थेने गाळ काढण्यात आला होता पण त्यामध्ये दुर्गंधी फक्त पाणी जमा झाले होते त्यामुळे त्या टाक्यातील सर्व पाणी उपसा करून काढून तिथे नैसर्गिक झरे पाणी साठण्यास सुरुवात होईल व जुन शेवटच्या आठवड्या पर्यंत पाणी साठा उपलब्ध असणार आहे. 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा ध्येय मंत्र घेवून मोहिमेची सांगता करण्यात आली.
#प्रतिष्ठानचेमंगेश_नवघणे म्हणाले, सह्याद्री च्या माथ्यावर अनेक घाट वाटा आहेत. ह्या वाटा देश आणि कोकणला जोडतात.ह्या वाटाचे संवर्धन करून पर्यटन विकास होऊ शकतो. ह्या ठिकाणी नवीन पर्यटन स्थळ विकसित होऊन कुंडलिका व्हॅली व देवकुंड चा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. सोई सुविधा उपलब्ध झाल्यावर मुळशी तील गड किल्ले धबधबे लेणी यांच्या पर्यटक वाढीमुळे देश आणि कोकण मधील गावे व पाड्यावरचे लोकांना रोजगार मिळेल. या मुळे ह्या घाटवाटा मुळे वेळेची व इंधनाची बचत होते. नातेवाईक हितसंबंध राखले जाते.
या महिमेत स्वराज कळंबटे, स्वहित कळंबटे,अनिल कडू,अभिजित शिंदे, मंगेश नवघणे सहभागी झाले होते.
सावळघाटयाबद्दलथोडक्यातमाहिती
पुर्वीच्या काळात म्हणजे अगदी सातवाहन, प्रतिष्टाणच्या (प्रतिष्टाण म्हणजे पैठण) , आणि त्याही पुर्वी प्राचीन भारताचा समुद्र मार्गे जगातील इतर देशांशी व्यापार व्हायचा. आपली सह्याद्रीची रांग भारताचे प्रामुख्याने दोन भाग करते. पहिला म्हणजे देश याचा अर्थ सह्याद्री रांगेच्या पुर्वेकडील प्रदेश (पश्चिम महाराष्ट्र व बाकी सगळा भारत देश) व दुसरा भाग म्हणजे कोकण. कोकणातील माणुस जर घाट चढुन वर येत असेल तर तो म्हणायचा “देशावर चाललोय”!कोकणात समुद्र किना-यावरील विविध बंदरांतुन व्यापार व्हायचा. देश व कोकण यांना जोडणा-या अनेक घाटवाटा अगदी प्राचीन काळापासुन अस्तित्वात आहेत. त्यावेळी ताम्हिणी ते भिरा हा मार्ग होता.ह्याच मार्गावर असाच एक घाट म्हणजे आपल्या मुळशी तालुक्यातील सावळ घाट.ताम्हीणी घाटाच्या उत्तरेला प्लस आणि कुंडलीका या सुंदर दऱ्यांच्या मधेच हि पायवाट खाली उतरते. या घाटात आपणास आजही सुबक अश्या 22 कोरीव पाय-या,3 पाण्याच्या टाकी,अशा प्राचीन खाणाखुणा दिसतील. आजच्या युगात घाटावरील लोक वापरत नसले तरी आज ही भटके मंडळी या घाट वाटा यांनी ये जा करीत असतात.