अखेर त्यांच्या पोटातील ओठावर आलं; मनोज जरांगे पाटील पुन्हा नामदेव शास्त्रींवर बोलले

0
1

धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी काल महंत नामदेव शास्त्री यांची भगवान गडावर भेट घेतली. यावेळी त्यांनी नामदेव शास्त्री यांना सर्व पुरावे दाखवले. तसेच संतोष देशमुख यांची हत्या का झाली? या हत्यामागे कोण होते? याचा लेखाजोखाच त्यांच्यासमोर मांडला. यावेळी नामदेव शास्त्री यांनी भगवान गड हा देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. या भेटीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका उच्चकोटीला पोहोचलेल्या व्यक्तीने विखारी शब्द बोलायला नको होते. अखेर त्यांच्या पोटातील ओठावर आलं, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जे दिसायला हवं होतं राज्याला ते दिसलं आहे. आम्हाला जातीयवादी ठरवत होते. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून जातीयवाद सुरू झाला. त्यांचे शब्द चुकीचे होते. विखारी होते. जातीय होते. आरोपींची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची आणि संतोष भैय्याच्या मागे राहायचं नाही, हे विखारी शब्द लोकांनी पाहिले. राज्य हळहळलं. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून हे शब्द आलेच कसे? एखादा नेता किंवा कार्यकर्त्याकडून एखादा शब्द जात असतो. पण उच्चकोटीच्या व्यक्तीने असं बोलणं महाराष्ट्राचं मोठं दुर्देव आहे. राजकारणासाठी हे बोललं जात आहे. या निमित्ताने पोटातील विचार ओठावर आले. राज्याने प्रत्यक्ष पाहिले, असं मनोज जरांगे म्हणाले.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

बाबांना दोष नाही
मी बाबांना दोष दिला नाही. त्या दिवशीही दिला नाही, आजही देत नाही. त्यांच्याकडून हे सर्व करून घेणारी टोळी विचित्र आहे. स्वत:चं पाप झाकण्यासाठी देवधर्मही ते पाहत नाहीत. विचित्र टोळी आहे. ही टोळी संपली पाहिजे, असं जरांगे यांनी सांगितलं.

तुमच्या पाया पडतो…
यावेळी त्यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं. न मिळणारं आरक्षण मिळालं. मी आडाणी असेल, कसाही असेल. पण तुमच्या पाया पडतो, तुम्ही आत्महत्या करू नका. धाडसी बना. एक दोन वर्ष रिपीट करा. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही आत्महत्या करू नका. तुमचे आईवडील पैसे पुरवतात. तुम्ही स्वप्न पाहता. पण टक्के नसताना इतरांना प्रवेश मिळतो. तुम्हाला नाही. पण कळ सोसा, असं आवाहन त्यांनी केलं.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

शहाणपट्टी करू नका
प्रत्येक विषयात मनोज जरांगे यांनी बोललंच पाहिजे असं नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यावेळी त्यांनी वडेट्टीवारांचा कडक शब्दात समाचार घेतला. मग तुम्हाला सर्व ठेवायचं का? आम्ही गोरगरीबांच्या बाजूने बोलायचं नाही का? तुमचे उद्योग बघा ना. तुम्ही कोण लागून गेला? तुम्हीच बोलायचा ठेका घेतला का? आम्ही का बोलायचं नाही? उगाच शहाणपट्टी मारू नका. आमचे चार पोरं मेली, परत आणून देता का? असा असतो का विरोधी पक्षनेता? दलित, आदिवासी, मुस्लिम आणि मराठ्यांबाबत आम्ही बोलायचं नाही का?, असा प्रश्नांचा भडिमारच जरांगे यांनी वडेट्टीवारांवर केला.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप