ऐकावं ते नवलच! तरुणींनी भाड्याने ठेवले बॉयफ्रेंड!; हा कलंक नको; करारबद्ध पद्धतीने आगळे वेगळे नातेसंबंध

0
1

नोकरी-लग्न करण्यासाठी सामाजिक स्तरावर एक निश्चित वयोमर्यादा असल्याचं सर्वांनाच माहित आहे. परंतु, समाजात असलेले काही नियम जे लोक पाळत नाहीत, त्यांना चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं जातं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसच त्यांच्या व्यक्तीमत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. परंतु, भारतात अशाप्रकारची परिस्थिती क्वचितच पाहायला मिळते.

इथे निश्चित वेळेतच काही मुली लग्नबंधनात अडकतात. एवढच नाही तर, काही मुली बिंधास्तपणे आपल्या पार्टनरबाबत कुटुंबियांना सांगत असतात. परंतु, व्हिएतनामच्या मुली याला अपवाद आहेत. त्या मुली त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करतात. अशातच त्यांच्यावर जर कौंटुबिक दबाव आला तर, त्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुली आगळावेगळा निर्णय घेतात. या निर्णयामुळे त्यांच्या आई-वडिलांचं मन तुटतं, पण भारतात असं काही घडलं तर त्यांच्या व्यक्तीमत्वाबाबत चुकीच्या पद्धतीने बोललं जातं.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

चायना मॉर्निंग पोस्टने नुकतीच एक बातमी प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल, अशी माहिती देण्यात आलीय. आपल्या कुटुंबाला खूश करण्यासाठी किंवा कुटुंबात आपलं रेप्युटेशन खराब होऊ नये, यासाठी व्हिएतनामच्या मुली भाड्याने त्यांच्यासोबत बॉयफ्रेंड ठेवतात. एकटेपणाचा कलंक आपल्या माथ्यावर लागू नये, यासाठी येथील तरुणी अशाप्रकारचा भन्नाट निर्णय घेतात. व्हिएतनाममध्ये अशाप्रकारच्या ट्रेंडची खूप चर्चा होत आहे.

येथील तरुणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा तरुणांशी कनेक्ट होतात, जे त्या मुलींचे पार्टनर म्हणून राहण्यास तयारी दर्शवतात. परंतु, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा रोमॅन्टिक क्षण साजरा केला जात नाही. कोटुंबिक दबावातून बाहेर पडण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय तरुणींना दिलासा देऊ शकतो. पण या तरुणींना मानसिकरित्या अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

कायद्याच्या चौकटीत बसत नाही

एका पार्टनरला भाड्याने घेणं कायद्याच्या चौकटीत बसत नाही. कारण अशाप्रकारचे संबंध कायद्यानुसार सुरक्षित नाहीत. अशा कृत्यामुळे तुम्ही एखाद्या अडचणीत सापडलात, तर तुम्ही स्वत: अशा परिस्थितीला जबाबदार राहू शकता. कायद्याचा विचार न करता अशाप्रकारे केलेले करार तुमच्यावर मोठं संकट उभं करू शकतात. जरी तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल, तर तुमच्या मान सन्मानालाही ठेच पोहचू शकते.