बौद्धजन पंचायत समितीची कॉन्सिल सभा मोठ्या उत्साहात संपन्न

0
2

मुंबई दि. २९ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती मुख्य कार्यालय यांच्या वतीने समितीचा ८२ वा वर्धापन दिन व कॉन्सिल सभा असा संयुक्त कार्यक्रम आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी केले सदर कार्यक्रमात समितीचे वार्षिक बजेट मांडण्यात आले तसेच सन २०२३-२४ ह्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये आवक निधी फेरफार सादर करून नवीन दरपत्रक सादर करण्यात आले ज्यास कॉन्सिल सभेच्या तीस कॉन्सिलरनी भाग घेऊन दरपत्रकास मंजुरी देण्यात आली.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

सदर प्रसंगी समितीचा ८२ वा वर्धापनदिन ही मोठ्या उत्साहात संपन्न झाला, आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील ऐतिहासिक स्मारकासंबंधी माहिती दिली तसेच सहाव्या आणि सातव्या माळ्याच्या बांधकाम कामाची CC प्राप्त झाली असून त्या कामाला ही लवकरच सुरुवात होणार आहे, तसेच रत्नागिरी, महाड, माणगाव, नवी मुंबई येथील व इतर ठिकठिकाणी असलेल्या समितीच्या जमिनींवर शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय उपक्रम राबवून कॉलेज, वैद्यकीय सुविधा आदी निर्माण करण्याचा समितीचा मानस आहे अशी माहिती दिली,तसेच भविष्याचा वेध घेत समिती कश्या प्रकारे कटिबद्ध आहे त्याची माहिती दिली तसेच सर्वांच्या आर्थिक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आर्थिक निधी भक्कम करण्याच्या उद्देशाने सदर बजेट पारित करण्यात आले आहे असे प्रतिपादन आनंदराज आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

सदर प्रसंगी सभापती आनंदराज आंबेडकर, उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच.आर.पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, रविंद्र पवार, प्रकाश करूळकर आदी कार्यकारी मंडळ, पदाधिकारी, महिला मंडळ, सभासद, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात कार्यक्रम पार पाडला, सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.