निवडणूक कुठेही फायदा गुजरातचाच; कर्नाटकला 50 कोटी मिळाले; अजून 200 कोटींची अपेक्षा

0

महानगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका असोत… देशात कुठेही प्रचार सुरू असला तरी उद्योग मात्र सुरतमधूनच होतो. तो कसा याबाबत तुम्हाला विचार पडला असेल तर सुरतमधून देशभरात विविध पक्षांचे मफलर आणि झेंडे तयार होत असतात. यामुळे इथला कापड व्यवसाय खूप मोठा झाला आहे. मंदीतून जात असलेल्या वस्त्रोद्योगाला इतर राज्यांतील निवडणुकांमधून ऑक्सिजन मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. गुजरातच्या सुरत शहराची ओळख हिरे व्यवसाय आणि कापड व्यापारासाठी आहे. पॉलिस्टर फॅब्रिक आणि त्याची छपाई येथे स्वस्त असल्याने, बहुतेक राजकीय पक्षांना त्यांचे झेंडे, टोप्या यांसारखे निवडणूक साहित्य सुरतमधूनच मिळते. येत्या काही दिवसांत तीन राज्यांत निवडणुका होत असताना कापड व्यापाऱ्याला 200 कोटींच्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मंदीतून जात असलेल्या वस्त्रोद्योगाला इतर राज्यांतील निवडणुकांमधून ऑक्सिजन मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. गुजरातच्या सुरत शहराची ओळख हिरे व्यवसाय आणि कापड व्यापारासाठी आहे. पॉलिस्टर फॅब्रिक आणि त्याची छपाई येथे स्वस्त असल्याने, बहुतेक राजकीय पक्षांना त्यांचे झेंडे, टोप्या यांसारखे निवडणूक साहित्य सुरतमधूनच मिळते. येत्या काही दिवसांत तीन राज्यांत निवडणुका होत असताना कापड व्यापाऱ्याला 200 कोटींच्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

कर्नाटक निवडणुकीदरम्यान सुरतच्या कापड व्यापाऱ्यांना 50 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याचा अंदाज आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापड व्यावसायीक उत्साही दिसत आहेत. कर्नाटक निवडणुकीदरम्यान सुरतच्या कापड व्यापाऱ्यांना 50 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याचा अंदाज आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापड व्यावसायीक उत्साही दिसत आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

वस्त्रोद्योगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्व राज्यांतील निवडणुकांदरम्यान पक्षांचे झेंडे, टोप्या यासह साहित्य सुरतमध्ये बनवून पक्षांकडून कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचवले जाते. वस्त्रोद्योगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्व राज्यांतील निवडणुकांदरम्यान पक्षांचे झेंडे, टोप्या यासह साहित्य सुरतमध्ये बनवून पक्षांकडून कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचवले जाते.

सुरत हे पॉलिस्टर कपड्यांचे प्रमुख केंद्र आहे. इथे उत्पादनापासून ते छपाईपर्यंतची सर्व कामे परवडणाऱ्या किमतीत होतात, त्यामुळे पक्षांना बजेटमध्ये निवडणुकीचे साहित्य मिळते. लहान-मोठे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि दावेदार निवडणुकीच्या दोन महिने आधीपासून येथील व्यावसायिकांशी संपर्क साधू लागतात. ऑर्डर देखील रोख स्वरूपात दिली जातात.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

येत्या काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेश ही मोठी राज्ये आहेत. येथील निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष जोरात प्रचार करत आहेत. येथील मजुरांना सुरतच्या कापड बाजाराची चांगलीच समज आहे. त्यामुळे येथील कापड व्यवसायाला तिन्ही राज्यांतून भरघोस नफा मिळू शकतो.