खडसेंच्या मर्मावर महाजनांनी ठेवलं बोट; लोक तोंडाला काळे फासतील : महाजनांचा इशारा

0
1

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी महाजनांवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी फर्दापूर रेस्ट हाऊसचे नाव घेत महाजन यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. महाजन यांनी माझ्यामागे ईडी लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लागला, असा आरोपही खडसेंनी केला होता. त्यांच्या आरोपांचा महाजन यांनी समाचार घेतला आहे.

भुसावळ येथील एका कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खडसे यांचे जावई तुरुंगात आहेत, त्याचे कारण सांगून महाजन यांनी खडसे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासह खडसे यांच्यावर वैयक्तीकरित्या मी कुठलेही आरोप केले नसल्याचा दावाही महाजन यांनी यावेळी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिले आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसेंचा जावई दोन-अडीच वर्षांपासून तुरुंगात आहे. अनेक प्रयत्न करूनही ते सुटत नाहीत. त्यांना जामीन मिळताना दिसत नाही. खडसे यांच्या स्वार्थामुळे विनाकारण जावयास तुरुंगात बसावे लागले आहे. आता त्यांना जामीन मिळत नाही. त्यामुळे त्यांची सुटका होत नाही.” यानंतर महाजनांनी खडसे यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, “खडसे यांचे डोके तपासायला लागणार आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सतत ईडी, मोक्का लावला, हे लावले, ते लावले, असे म्हणत असतात.”

खडसे यांच्यावर कुठलेही आरोप केले नसल्याचा दावाही महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, ” खडसेंवर झालेले सर्व आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत. मी त्यांच्याविरोधात कुठलेही आरोप केलेले नाहीत. दमानिया त्यांच्याविरुद्ध न्यायालयात गेल्या होत्या. त्यामुळे सर्व गोष्टी समोर आल्या. न्यायालयात चौकशी झाली. त्या चौकशीच सर्व काही पुढे आहे आहे. जास्त बोलायला लावू नका. मी तोंड उघडले तर लोक तुमच्या तोंडाला काळे फासतील.”

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला