बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराड हाच सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.






तपासात आरोपी सुदर्शन घुलेच्या ब्लॅक कलरच्या एसयुव्हीने संतोष देशमुख हत्येचं कौर्य सांगितले आहे. सुदर्शन घुलेच्या कारमध्ये पोलिसांना 19 पुरावे सापडले आहेत.
वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप ही दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ब्लॅक कलरची एसयूव्ही वापरण्यात आली होती. गाडी मध्ये 19 महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी ठरली महत्त्वाची ठरली.
सुदर्शन घुलेच्या कारमधून कोणते पुरावे सापडले…
- – आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला.
- – कारमधून दोन गॉगल्स सापडले
- – सुदर्शन घुले चे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॉकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले.
- – सहा आरसी बुक सापडले
- – सुदर्शन घुलेचे, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप सापडला
- – लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार
- – रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा सीआयडीला सापडला…
फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मारहाणीचा व्हिडीओ…
कृष्णा आंधळेची मोकारपंती असा या व्हाट्सअॅप ग्रुपचं नाव होते. या ग्रुपमध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होते हे पाहिले होते. फॉरेन्सिककडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे 10 ते 12 व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडीओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले आहेत. सुदर्शन घुले हा कशा प्रकारे संतोष देशमुख ला मारहाण करतोय हे दिसत आहे.











