‘श्री संत तुकाराम’ इथेनॉल, को-जन प्रकल्प पूर्णत्वास; सचोटी अन् शेतकरीहित धोरणावरच तुल्यबळ लढतीस सर्वपक्षीय ‘टीम नाना’ सज्ज?

0

मुळशी, मावळ, हवेली, खेड, शिरूर तालुक्यातील शेतकरी विकास व्हावा या उदात्त हेतूने विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी कासारसाई (ता. मुळशी) येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आल्यानंतर अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कार्यरत राहावा यासाठी कायमच प्रयत्न केले आहेत. सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत असल्याने श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या कोणत्याही प्रशासकीय कामासाठी या प्रणालीचा ‘दुग्ध शर्करा’ म्हणून उपयोग होत आहे. आजही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वात संचालक मंडळ अहोरात्र काम करत आहे. आजपर्यंत कारखान्याच्या संचालकांनी सभासदांच्या हिताची अनेक कामे मार्गी लावली असून शेतकरी हित हेच महत्त्वाचे मानत कोणत्याही राजकीय परिवेशाचा विचार न करता राजकारण एका बाजूला आणि साखर कारखाना एका बाजूला अशी भूमिका घेत ‘टीम नाना’ यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

वाढत्या शहरीकरणाच्या कचाट्यात सध्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असताना संस्थापक नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वात अत्यंत सोचटीने काम करत असताना यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र मावळ भोर वेल्हा मुळशी आणि शिरूर हवेली भागातील काही गडगंज लोकांच्या मनीषा कारखान्याचा ताबा घेण्याच्या असल्यातरी सुद्धा स्वच्छ कारभार आणि सचोटीने शेतकरी हीत जपण्यात गेले पाच वर्ष काम केले असल्याची ग्वाही त्यांच्यामार्फत दिली जात आहे. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे संचालक तुकाराम विनोदे, दिलीप दगडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, बाळकृष्ण कोळेकर, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, अंकुश उभे, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, महादेव दुडे, शामराव राक्षे, दिनेश मोहिते, ज्ञानेश नवले, नरेंद्र ठाकर, सखाराम गायकवाड, शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, प्रवीण काळजे, सुभाष जाधव या ‘टीम नाना’ चमूने कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांचे तंतोतंत नियोजन कारखान्याच्या हितास कारणी पाडले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सहकार हे घरचंच कार्य

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळामधील सर्व संचालक कारखान्याच्या कोणत्याही कामात व्यक्तिगत लक्ष घालत सर्वात जास्त फायदा कारखान्याला कसा होईल याचाच विचार करत असतात. त्यामुळेच फक्त ऊस गाळप आणि त्या क्षमतेनुसार राज्य शासनाकडून काही मदत निधी मिळवणे ही भूमिका न ठेवता विभिन्न प्रकल्प शेतकरी हितार्थ राबवण्याची गेली पाच वर्ष काम केले आहे. नुकताच सुरू करण्यात आलेला इथेनॉल प्रकल्प हे त्याचेच उदाहरण….. ४५ हजार लिटर क्षमतेचा आसवणी (इथेनॉल) प्रकल्प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने प्रकल्प अहवाल तयार केला. प्रकल्पाची किंमत ९२ कोटी ३२ लाख ठरली. प्रकल्प उभारणीस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ७८ कोटी रुपयांचे मध्यम मुदत कर्ज दिले. या कर्जासाठी बँकेच्या नियमानुसार स्वभाग भांडवलातून कारखान्याने १६ कोटी रुपये उभे केले. ठेकेदारांकडून दर्जेदारपणे काम करून घेतल्याने ९२ कोटी ३२ लाखांचा हा प्रकल्प ७९ कोटी ५५ लाख रुपयांमध्ये पूर्ण झाला. कमी वेळेत हा प्रकल्प उभा झाल्याने या प्रकल्पास केंद्र शासनाकडून सबव्हेंशन स्किमअंतर्गत व्याजामध्ये सवलतीच्या दराचा फायदा मिळणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

बँकेचे ७८ कोटींचे कर्ज मंजूर असतानाही ६४ कोटी ३३ लाख रुपयेच कर्ज घेतले गेले, कमी खर्चात, विक्रमी वेळेत कारखान्याने ११ महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित केला. आज कारखान्याकडे २८ हजार लिटर इथेनॉल उपलब्ध असून 3 लाख ४१ हजार लिटर स्पिरीट तयार केले आहे. मुळशी, मावळ, हवेली, खेड, शिरूर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना इतर प्रकल्पांतूनही आर्थिक सक्षमता मिळावी, यासाठी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. प्रकल्पातून शासनाच्या नियमानुसार सर्व आवश्यक परवानगी घेऊन इथेनॉल व रेक्टिफाइड केलेले आहे. स्पिरिट उत्पादन सुरू केले ज्यूस किंवा सिरपपासूनही इथेनॉल उत्पादन मिळेल, अशी मशिनरी बसविली गेली आहे. भविष्यात याचाही विचार करण्याचा विद्यमान संचालक मंडळाचा मानस आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा