केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: शिवसेनेला १ कॅबिनेट एवढी राज्यमंत्रीपदं ‘वर्षा’ वर खासदारांची बैठक

0
1

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांनाही केंद्रात मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी एकनाथ शिंदेंनी आज (24 मे) रात्री आठ वाजता शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर बैठक बोलवली आहे.

निती आयोगाच्या बैठकीआधी राज्यातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. याचवेळेस सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पदासंदर्भात चर्चा देखील करणार आहेत. एक किंवा दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद किंवा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद आणि तीन केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

तसेच उद्धव ठाकरे यांच्या लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावाही घेण्यात येणार आहे. ठाकरे गटाने मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदार संघाचा उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. विशेष बाब म्हणजे, ठाकरे गटाकडून मुंबईतील लोकसभा मतदार संघाची चाचपणी सुरु झाली आहे. यातही जे खासदार शिंदे गटात गेले आहेत त्यांच्या मतदार संघांची चाचणी प्रामुख्याने केली जात आहे.त्या दृष्टीने या मतदार संघात उमेदवारही निश्चित होऊ शकतात.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे देखील आज वर्षा निवासस्थानी खासदारांची बैठक घेणार आहेत. एकनाथ शिंदेदेखील मुंबईतील लोकसभानिहाय मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही स्थानिक परिस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरीकडे भाजपनेही लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने मिशन ४८ ची सुरुवात केली आहे. भाजपही लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून उमेदवारांचीही चाचपणी सुरु केली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय