शाहरुखला बॉक्स ऑफिसवर नडणार ‘पुष्पा’.. अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा 2’ ची रिलीज डेट आली समोर

0

अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ २०२१ साली जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा मोठा धमाका झाला होता. आणि त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट सगळे पाहत होते. अधिकृतरित्या ‘पुष्पा २’ ची घोषणा कधीच करण्यात आली आहे.

काही दिवस आधी निर्मात्यांनी पुष्पा २ चा एक टीझर व्हिडीओ आणि अल्लू अर्जूनचा एक पोस्टर रिलीज केलं होतं, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टीझर आणि पोस्टर समोर आल्यानंतर चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. आणि प्रत्येकाला या सिनेमाची रिलीज डेट जाणून घ्यायची होती.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

अधिकृतरित्या पुष्पा २ ची रिलीज डेट समोर आलेली नाही पण काही मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. बोललं जात आहे की अल्लू अर्जूनचा हा सिनेमा २२ डिसेंबरला सिनेमागृहात भेटीस येईल.

आता रिलीज डेट विषयी मेकर्सनी काही सांगितलेलं नसलं तरी जर या तारखेला ‘पुष्पा २’ रिलीज झाला तर शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमाशी ‘पुष्पा २’ ची टक्कर झालेली पहायला मिळू शकते. ‘डंकी’ सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानीचं आहे. ‘डंकी’ देखील डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहरुख सोबत पहिल्यांदाच तापसी पन्नू दिसणार आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?