समीर पाटीलांकडून धंगेकरांचा करेक्ट कार्यक्रम? ‘परफेक्ट ठोका दाखवा मकोका’ …अन्यथा 50 खोकेचा दावा’ संघर्ष शिगेला

0

पुणे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर ‘परफेक्ट ठोका मारत करेक्ट कार्यक्रम (सांगली पॅटर्न) करण्याचा दृढनिश्चय केला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप या मध्ये माझा कुठलाही विषय नसून माझा संबंध फक्त मी चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यालयात कामाला आहे किंवा काम करतोय हे सिद्ध करावे आणि दुसरे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे मी मकोका आरोपी आहे. या दोन गोष्टी जर सिद्ध केल्या नाहीत तर 50 कोटी रुपयाची अब्रू नुकसानी द्यावी लागेल अशी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचा मला कोणताही खेद वाटत नाही; उलट माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. रवींद्र धंगेकर सध्या बिनबुड्याचे आरोप करत असून समीर पाटील हा गुंड निलेश घायवळच्या संपर्कात होता, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. यावरुन समीर पाटील यांनी अखेर ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. आजपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी ज्यांच्या वरती आरोप केले किंवा पाठपुरावा करून प्रसिद्धी माध्यमांमध्ये आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा त्यांनी ‘पाटील’शी पंगा घेतला आहे तो ही सांगलीच्या! आत्ता देशातील कोणत्याही न्यायालयापर्यंत जायची वेळ आली तरीसुद्धा हा समीर पाटील जाणार म्हणजे जाणारच अशी ठाम भूमिका पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मुळात पुणेकर म्हणून गुन्हेगारीवर बोलत असताना एखाद्या व्यावसायिकाची बदनामी करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत करणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या विषयी बदनामीकारक वक्तव्य करणे हे खेदजनक असून भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे. पुणे शहर आणि विशेषता कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं सध्या सुरू असलेलं काम सर्वश्रुत असून सर्वसामान्य नागरिकांची त्यांच्याविषयीची भूमिका ही जगजाहीर असताना चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करणे कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पचनी पडत नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणेच चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्य मलाही अत्यंत अभिमानास्पद वाटत असताना त्यांच्यावर होणारी टीका मनाला खंत लावून जाते. मुळात चंद्रकांतदादा पाटील यांना लक्ष करताना समीर पाटील या माझ्या नावाचा वापर केला जाणे हेच माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

कोथरूडमधील नागरिकांना समीर पाटील कोण आहे माझे कोणकोणते व्यवसाय आहेत याची गेली 25 वर्षापासून कल्पना आहे. संपूर्ण पुणे परिसरामध्ये ‘अदखलपात्र’ही गुन्हा दाखल नसताना माझ्यावर मकोकासारखा गंभीर आरोप करणे हे माझ्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचवणारे आहे. त्यामुळे धंगेकरांना 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. “मी मकोकामधील आरोप असल्याचं सिद्ध करा अन्यथा गुन्हा नोंदवू”, असा इशारा समीर पाटील यांनी दिला आहे. “रवींद्र धंगेकर यांनी आरोप सिद्ध केले नाहीत किंवा माफी मागितली नाही तर कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करु”, असं समीर पाटील म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती