एसबीआय म्युच्युअल फंडातर्फे एसबीआय निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्स फंडाचा शुभारंभ

0
24

  • नवीन फंड ऑफर 16 ऑक्टोबर 2024 रोजी खुली होणार असून 25 ऑक्टोबर 2024 रोजी बंद होईल.
  • निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी आणि कंझ्युमर नॉन-ड्युरेबल्स, आरोग्यसेवा, ऑटो, टेलिकॉम सेवा, फार्मास्युटिकल्स, हॉटेल्स, मीडिया आणि एंटरटेनमेंट यांसारख्या देशांतर्गत उपभोग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ कामगिरीसाठी या फंडाची रचना करण्यात आलेली आहे. तसेच या क्षेत्रातील कंपन्यांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक महसूल देशांतर्गत बाजारातून मिळतो (निर्यात उत्पन्नाव्यतिरिक्त). पुनरावलोकनावेळी या कंपन्या निफ्टी 500  इंडेक्सचा भाग असणे आवश्यक आहे.
  • निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्समध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) वर सूचीबद्ध 30 कंपन्यांचा समावेश आहे.

 

पुणे  : एसबीआय म्युच्युअल फंडाने  एसबीआय निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्स फंड ही नवीन फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणली आहे.  निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्स आधारे वाटचाल करणारी ही योजना मुदतमुक्त श्रेणीतील एक योजना आहे. गुंतवणूकीसाठी नवीन फंड ऑफर (एनएफओ) चा कालावधी 16 ते 25 ऑक्टोबर 2024 असा आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

संबंधित निर्देशाकांचा मागोवा घेताना त्रुटीला अधीन राहताना निर्देशांकात समाविष्ट असलेल्या समभागांच्या एकूण परताव्याशी मिळताजुळता परतावा प्रदान करणे, हे या योजनेचे गुंतवणुक उद्दिष्ट आहे. तथापि, या योजनेच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईलच, याची कोणतीही हमी किंवा आश्वासन दिले जात नाही.

एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ समशेर सिंग म्हणाले, “वाढते उत्पन्न, लोकसंख्येतील बदल, डिजिटलायझेशन आणि नागरीकरण यासारख्या संरचनात्मक बदलांमुळे भारताची जीवनावश्यक वस्तूंची उपभोग वाढ निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. या वाढीवर प्रभाव टाकणाऱ्या अन्य प्रमुख घटकांमध्ये तरुण आणि वाढणारी लोकसंख्या, विवेकात्मक खर्चातील वाढ आणि शहरी भागांमध्ये प्रिमियम वस्तूंचा अधिकाधिक वापर यांचा समावेश होतो. जगातील प्रमुख ग्राहक बाजारपेठांत भारताचा समावेश होत असताना ग्राहकोपयोगी वस्तू, रिटेल, आरोग्यसेवा, लक्झरी गुड, एफएमसीजी, विमान वाहतूक आणि ईकॉमर्स यासारख्या क्षेत्रांना लक्षणीय फायदा होणार आहे. देशांतर्गत उपभोग क्षेत्रातील कंपन्यांच्या विविध पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी एसबीआय निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना देत आहे. त्यामुळे भारताच्या उपभोग कथेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा फंड एक उत्तम पर्याय ठरला आहे.”

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​डेप्युटी एमडी आणि जॉइंट सीईओ डी पी सिंग म्हणाले, “घरगुती उपभोग हे भारताचे प्राथमिक आर्थिक वाढीचे इंजिन आहे. या इंजिनने राष्ट्राला विकासाच्या पुढील टप्प्यावर नेले आहे. वाढत्या उत्पन्नासह अत्यावश्यक आणि ग्राहक विवेकी वस्तूंवरील खर्चामुळे ग्राहकपयोगी वस्तू, ऑटोमोबाईल, आरोग्यसेवा आणि रिटेल सारख्या उद्योगांना चालना मिळणार आहे. भारताची मोठी तसेच तरुण लोकसंख्या, वाढत्या उत्पन्न पातळीमुळे उपभोगावर आधारित क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन वाढीसाठी एक भक्कम पाया तयार झालेला आहे. भारतातील विस्तारलेला मध्यमवर्ग तसेच श्रीमंत वर्गांना लक्ष्य करणाऱ्या व्यवसायांना महत्त्वपूर्ण संधी तयार झालेली आहे. भारताच्या आर्थिक वाढीच्या या महत्त्वाच्या प्रेरक घटकांचा लाभ घेण्याची भरीव संधी एसबीआय निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना देत आहे.”

ही योजना किमान 95 टक्के तर अधिकाधिक 100 टक्के निधी प्रामुख्याने निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या समभागांमध्ये गुंतवणार आहे. तर 5 टक्क्यांपर्यंतचा निधी सरकारी कजरोख्यांमध्ये (जसे की, जी-सेक, एसडीएल, ट्रेझरी बिले आणि अन्य कोणतीही वित्तीय साधने. आरबीआयने वेळोवेळी निर्दिष्ट केल्यानुसार) तसेच त्रिपक्षीय रेपो आणि लिक्विड म्युच्युअल फंडाच्या युनिट्समध्ये गुंतविला जाणार आहे. या फंडात प्रारंभिक किमान गुंतवणूक 5,000 रुपये करावी लागणार असून त्यानंतर 1 रुपयांच्या पटीत निधी गुंतविता येणार आहे. तसेच दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक आणि वार्षिक एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) व्दारे देखील या फंडांत गुंतवणूक करता येईल.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

हर्ष सेठी हे एसबीआय निफ्टी इंडिया कंझम्पशन इंडेक्स फंडाचे फंडाचे व्यवस्थापक आहेत. ते मे 2007 पासून फंड हाऊसमध्ये कार्यरत आहेत. ते सध्या एसबीआय निफ्टी आयटी इटीएफ, एसबीआय निफ्टी कन्झम्पशन इटीएफ, एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक इटीएफ, एसबीआय निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंड आणि एसबीआय निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड यासारख्या पॅसिव्ह योजनांचे व्यवस्थापन सांभा‌ळत आहेत.