महात्मा फुले योजना थकीत बिलांपोटी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरात रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

0

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. बुधवारअखेर (दि. ५) या योजनेची थकबाकी १,५७७ कोटी ७२ लाख २३ हजार ६८० हजार रुपयांवर पोहोचली. यासंदर्भात मंगळवारी (दि. ४) आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले. या निधीतून रुग्णालयांची थकबाकी अदा करावी, असे आदेशात म्हटले आहे.

सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदायी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना निधीटंचाईच्या गर्तेत सापडली होती. या योजनेतून उपचार करणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांना जुलै २०२४ पासून छदामही देण्यात आलेला नाही. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सामान्यत: दीड ते दोन महिन्यांत पैसे अदा होतात; पण सध्या मात्र आठ महिन्यांपासून पैशांची प्रतीक्षा आहे. परताव्यासाठी रुग्णालये शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

राज्यभरातील रुग्णालये – १,६६१                              जुलै २०२४ पासून थकबाकी – १,५७७ कोटी ७२ लाख,

जिल्हानिहाय थकबाकी अशी- ———-

जिल्हा थकबाकी (कोटींमध्ये)

अहिल्यानगर ९८ कोटी १४ लाख

अकोला ३५ कोटी ६० लाख

अमरावती ४६ कोटी

बीड २० कोटी

भंडारा ४ कोटी

बुलडाणा २० कोटी

चंद्रपूर ५ कोटी

छत्रपती संभाजीनगर ११३ कोटी

धाराशिव ७ कोटी

धुळे ४५ कोटी

गडचिरोली १ कोटी

गोंदिया ७ कोटी

हिंगोली ३ कोटी

जळगाव ४२ कोटी

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

जालना २८ कोटी

कोल्हापूर ९० कोटी

लातूर २४ कोटी

मुंबई आणि उपनगरे १२७ कोटी

नागपूर १०६ कोटी,

नांदेड ४३ कोटी

नंदुरबार ६ कोटी

नाशिक १८७ कोटी

पालघर ७ कोटी

परभणी ५ कोटी

पुणे ११५ कोटी

रायगड २९ कोटी

रत्नागिरी १८ कोटी

सातारा ४६ कोटी

सांगली – ५९ कोटी

सिंधुदुर्ग ७ कोटी

सोलापूर ७१ कोटी

ठाणे ९८ कोटी

वर्धा ३९ कोटी

वाशिम १४ कोटी

यवतमाळ १२ कोटी