छोट्या गावातील मराठी माध्यमाच्या शाळेतून भारताच्या ₹240 कोटींच्या ब्रँडपर्यंतचा प्रवास

0

पुणे : महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील, मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्याचा हा प्रवास – चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि नंतर भारतातील आघाडीचा सीए कोचिंग ब्रँड एस पी सी उभारणाऱ्या त्या स्वप्निल पाटणीचा. हा प्रवास सोपा नव्हता.

संघर्ष, जागरणं, अपयश आणि अनगिनत प्रयत्न यांवर उभं राहिलेलं हे स्वप्न आहे. एक काळ असा आला जेव्हा मुख्य विषयच अचानक काढून टाकले गेले — वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात संपल्यासारखी वाटली.

पण त्या क्षणी मी स्वतःला एकच वाक्य सांगितलं — “मी करून दाखवीन.”  कारण मला विश्वास होता —गाव छोटं असो, भाषा मराठी असो, पण जिद्द मोठी असेल, तर यश नक्कीच तुमचं असतं. आज तो विश्वास सत्यात उतरला आहे. एस पी सी आज ₹240 कोटींच्या मुल्यांकनावर पोहोचलं आहे आणि भारताचे नामांकित गुंतवणूकदार श्री. सुनील सिंगानिया सर आमच्यासोबत स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणून जोडले गेले आहेत.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

ही प्री आय पी ओ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट एस पी सी च्या दृष्टीवर, विस्तारक्षमतेवर आणि आगामी आय पी ओ तयारीवर असलेला विश्वास दर्शवते. आता एस पी सी चं पुढचं ध्येय आहे.

स्वप्निल पाटणी म्हणतात —

“सुनील सरांचा विश्वास आणि मार्गदर्शन आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. त्यांच्या सहकार्यामुळे एस पी सी चा पुढचा प्रवास आणखी वेगाने आणि नव्या उंचीवर होईल.”

माझं बळ म्हणजे माझं कुटुंब —

अंकिता, जियाना, आई-वडील, तुमचं प्रेम, संयम आणि आशीर्वाद हेच माझ्या प्रत्येक यशाचं खरं कारण आहेत.

हा प्रवास एका मध्यमवर्गीय विद्यार्थ्याची गोष्ट आहे —

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

जो हार न मानता उभा राहिला आणि स्वतःचं यश लिहिलं.₹240 कोटींचं मूल्य हे केवळ एक आकडा नाही, तो आहे मेहनतीचा, सातत्याचा आणि विश्वासाचा विजय. जर आयुष्य तुमचे विषय काढून घेत असेल, तर तुम्ही स्वतःचं सिलेबस तयार करा…

स्वप्नील पाटणी – संस्थापक एस पी सी पुणे..